मराठी ब्लॉगर्स नेटवर्क

 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

Saturday, July 20, 2019

आपल्याचं विश्वात आपण...।।

     दुपारचे 12 वाजले असावे...सकाळच्या सोनेरी किरणांची जागा आता आग ओकणाऱ्या रणरणत्या उन्हाने घेतली होती. मी पिरंगुट बस थांब्यापाशी उभा होतो. कोथरूड डेपोला जाणाऱ्या बसची वाट पाहत माझ्यासारखे अजून कित्येक प्रवासी ताटकळत उभे होते . काही वयस्क लोक वाढत्या उन्हाला कंटाळून कुठेतरी टेकून उभा होते आणि तरुण तरुणींच तर केव्हाही नवल वाटण्यासारखंच वर्तन होत अगदी सर्वानीच कानात मस्तपैकी हेडफोन्स घालून गाण्याच्या तालात या आग ओकणाऱ्या सूर्यालाही विसरून गेले होते तस पाहायला गेलं तर माझी पण तीच अवस्था होती अस म्हणावं लागेल.........
          पिरंगुट चा बस थांबा म्हणजे मुख्य बाजारपेठेत असल्याने लोकांची नेहमीच वर्दळ असते.एवढ्या गर्दीत माणसांचे कित्येक निरनिराळे चेहरे अन त्यावरचे भाव दिसत होते प्रत्येकजण आपापल्या कामात मग्न.....बस थांब्याच्या बाजूलाच लागून लहान मोठ्या दुकानांची रेलचेल आहे. आणि तिथंच कुत्र्याचं एक लहान पिल्लू वळचणीला अंग मुरकुटून पडलं होत.एवढ्या उन्हात ते तहान अन भुकेमुळे अगदी व्याकुळ झालं होत.अचानक ते पिल्लू धडपडत उठून त्या बाजूच्या किरणामालाच्या दुकानासमोर जाऊन कोणाच्या तरी हातातून पडलेला पावाचा शिळा तुकडा तोडू लागलं ते त्या वृद्ध दुकानदाराने पाहिलं. माझंपन तिकडेच लक्ष होत तेवड्यात तो दुकानदार बाहेर येऊन त्या पिल्लाला हाकलून देऊ लागला पण ते उपाशी पिल्लू भुकेने व्याकुळ असल्याने तिथून जायला तयार होईना हे पाहून त्या दुकानदाराला राग आला. अन रागाने तो पिल्लाला लाथेने उडवू लागला. एव्हड्या भयानक उन्हात पडलेल्या त्या लाथेन पिल्लू वेदनेने विव्हळू लागलं...त्या आवाजाबरोबर काही लोकांच्या नजरा तिकडे वळल्या. पण त्या पिल्लाचा हट्टीपणा पाहून दुकानदाराने अतीव रागात येऊन त्याच्याच म्हातारपणाची आधार असलेली काठी बाहेर काढली आणि त्या पिल्लाच्या पाठीत जोरदार हाणली तस ते पिल्लू खूपच ओरडू लागलं हे पाहून माझं मन हेलावल पण त्याला वाचवावे या हेतूने एक पाऊलही पुढे सरकलो नाही. मनातून त्या वृद्धाचा खूप राग येऊनही मी ते मुकाटपणे ते पाहतच राहिलो.....
        हे सर्व होत असताना गर्दीत उभा असेलेला एक 24-25 वर्षे वयाचा तरुण तो दुकानदार शांत बसत नाही पाहून धावतच पिल्लाकडे गेला अन त्याला उचलून घेतलं पण भेदरलेल्या त्या पिलाने अजून ओरडायला सुरवात केली.पण थोड्याच वेळात मायेने फिरवलेल्या हाताच्या स्पर्शाने त्याला जरा धीर आला अन ते शांत झालं. त्या तरुणाच्या कृत्याने सर्व लोकांना आपली लाज वाटली अगदी मलाही....एवढ करून थांबता त्याने समोरच्या वडापावच्या गाडीवरून वडापाव खरेदी करून अन बिस्किटे घेऊन त्याला सावलीत ठेवलं अन त्याच्यासमोर ते सगळं खायला ठेवलं आणि थोडं पाणीही पाजलं...
     त्या तरुणाच्या तिथून जाण्यानंतर ते पिल्लू लगेच तिथून निघून गेलं अगदी ते सर्व न खाता ...कारण त्याच पोट भरलं होत त्या मायेच्या स्पर्शानं....आणि हे खाताना पण कोणीतरी येऊन मारेल हिपण भीती त्याला होतीच...सांगायचं एवढच होत कि माणसं आपलं जग बनवताना त्याला आजूबाजूच्या प्राणी पक्षांचा विसरच पडला त्याला अस वाटतय कि हे सगळं फक्त आपल्यासाठी आहे....महत्वाची गोष्ट म्हणजे तो तरुण कोणी श्रीमंत नव्हता पण त्याच मन श्रीमंत होत...त्याच्यात माणुसकी शिल्लक होती म्हणून तो त्या पिल्लाला होणारा त्रास सहन करू शकला नाही....आपला यांत्रिकपणा सोडायला हवा ....आपण बदलायला हवं...अगदी मीही...कारण मीही तिथे सर्वांसारखा बघ्याचं होतो...

लेखक : चेतन पाटील
8888541585

आपल्याचं विश्वात आपण...।।

     दुपारचे 12 वाजले असावे...सकाळच्या सोनेरी किरणांची जागा आता आग ओकणाऱ्या रणरणत्या उन्हाने घेतली होती. मी पिरंगुट बस थांब्यापाशी उभा होतो...